अपंग बांधवांचा ५% राखीव निधी तत्काळ वाटप करा- सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांची मागणी

0 103

निफाड,दि26 (प्रतिनिधी) ः
निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील अपंग बांधवाना ५% निधी वितरित करण्यात यावा या साठी तारुखेडले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी ई – मेल मार्फत निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व पंचायत समिती निफाड यांना पाठवले आहे. ग्रामपंचायतीच्या मार्फत अपंग साठीचा ५% निधी वितरित करण्यात आलेला नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत यांनी स्वउत्पन्नातून अपंग बांधवांसाठी ५% निधी राखीव ठेवण्यात येऊन हा निधी दरवर्षी अपंग बांधवांसाठी रोख स्वरूपात वाटप करण्याचे आदेश निग्रमित केलेले आहे परंतु तारुखेडले ग्रामपंचायत यांनी अद्याप हा निधी अपंग बांधवाना वाटप केलेला नाही या वर्षी दिवाळी गेली परंतु काहीच मदत देण्यात आली नाही गावातील अपंग बांधव मदत कधी मिळेल याची वाट पाहत आहे गावात अंदाजे ११ अपंग बांधवांची नोंद ग्रामपंचायत दरबारी आहे सदर निधी वितरित करण्यात यावा या साठी ग्रामपंचायत यांना निवेदन ही दिले होते परंतु अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे श्री. गवळी यांनी पुन्हा निवेदन दिले ग्रामपंचायत यांनी प्रत्येक वर्षी या निधी ची तरतूद करणे आवश्यक आहे गावातील अपंग लोकांना घरकुल चा लाभ, घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये ५०% टक्के सवलत किंवा माफी अशी अनेक योजना अपंग बांधवासाठी गावात राबवणे शक्य आहे परंतु असे होताना दिसत नाही या कडे पंचायत समिती मार्फत विचारणा होत नाही संबंधित विभाग यांनी तारुखेडले गावातील अपंग ग्रामस्थ यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी श्री. गवळी यांनी निवेदनात केली आहे.

error: Content is protected !!