सेलू ( नारायण पाटील )
तिरुपती बालाजीच्या दर्शनाने मनाला शांतता ,सकारात्मक ऊर्जा व भक्तीचा अनोखा अनुभव मिळत असल्यामुळे अनेक भाविक बालाजीच्या दर्शनासाठी जातात .परंतु सेलूच्या जयसिंग शेळके या बालाजी भक्ताने गेल्या २५ वर्षा पासून अखंडपणे तिरुपतीची १०८ वारी करून बालाजीचे दर्शन घेतले आहे .
बालाजीच्या १०८ मंत्राचे महत्व सर्वश्रुत आहे परंतु शेळके यांनी १०८ वेळा बालाजीचे दर्शन घेऊन एक विक्रमच प्रस्थापित केला आहे .
याबाबत त्यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सांगितले की बारावी वर्गात शिकत असतांना आपण मित्रांसोबत बालाजीला गेलो .व पुढे दरवर्षी जसजसा तिथे जाऊ लागलो तशी माझी सर्व इच्छित कामे पूर्ण होत गेलीव.अगोदर आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे रेल्वे च्या जनरल डब्यातून प्रवास करावा लागत होता .परंतु आता मात्र आरक्षण काढून प्रवास चालू आहे .दर्शन वारी किती करायच्या हे ठरवले नव्हते भगवंत बोलवत गेले व मी जात राहिलो .आतापर्यंत २५ वर्षात १०८ वारी पूर्ण झाल्या असून असुनही भविष्यात किती होतील ते भगवंताच्या हातात आहे .बालाजीच्या दर्शनात अफाट शक्ती आहे ती कुठेच नाही त्यामुळे तिथे गेल्यानंतर आत्मिक समाधान मिळतेच व आपले अडलेली कामे मार्गी लागतात हे खरे आहे .व याचा अनुभव माझ्या सोबत आलेल्या अनेकांना आलेला आहे . असेही त्यांनी यावेळी सांगितले .
Shabdraj www.shabdraj.com