पाथरी,दि 17 ःलोकनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह ओसंडुन वाहत होते.
सकाळपासून तालुक्यातून व जिल्ह्यातून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यां शुभेच्छा देण्यासाठी उत्साह दिसून येत होता. ग्रामीण भागातील कार्यकर्ते म्हणत होते. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांना तुम्हीच गरीबाचे कैवारी आहेत अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.पाथरी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस मंगळवार १५ जुलै रोजी शहर व ग्रामीण भागात उत्साही वातावरणात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. दिवसभर पाथरी शहरात माजी आ. बाबाजानी दुर्राणी मित्र मंडळाच्या व कार्यकार्त्यांवतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी शालेय साहित्य वाटप, राशन किट वितरण, वृक्षारोपण, साही वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आणि नागरी सत्कार समारंभ यासारखे उपक्रम पार पडले. तसेच सकाळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल २२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. दिवसभर माजी आ. दुर्राणी यांच्या निवासस्थानी नेते, कार्यकर्ते, व्यापारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांची वर्दळ सुरु होती. शुभेच्छा देण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यांना भेट दिली, विविध ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते, सायंकाळी पाथरी शहरातून शिक्षक कॉलनीपर्यंत भव्य मोटरसायकल आणि पाय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विविध वयोगटातील कार्यकर्ते व चाहते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वतः माजी आमदार दुर्राणी यांचाही या रॅलीत सहभाग होता, तर त्यांचे चिरंजीव जुनेद दुर्राणी यांनी या रॅलीचे नेतृत्व करत उपस्थितांचे लक्ष वेधले.