04/02/26
Breaking News

महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड-महावितरणने १७ मीटर घेतले ताब्यात

सुशिल दळवी
पुर्णा,दि 07 ः
ताडकळस प्रतिनिधी
पूर्णा तालुक्यातील ताडकळस गावात वीज चोरीप्रकरणी महावितरणच्या पथकाने धडक कारवाई केली. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता टेंभुर्णी, तसेच कार्यकारी अभियंता गाडेकर , यांच्या निर्देशानुसार उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार यांनी धड़क मोहिम हाती घेतली आहें.

या कारवाईदरम्यान १७ वीज मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे उघड झाले असून ती सर्व मीटर ताब्यात घेण्यात आली आहेत. या मोहिमेत उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार व त्यांचे विशेष पथक तसेच कनिष्ठ अभियंता घोडके सा व स्थानीय लाईनमन ,यांचा विशेष सहभाग होता. त्यांच्या सतर्कतेमुळे वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला.
महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी अशा तपास मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …