18/07/25
Breaking News

पूर्णेत मीटरमध्ये छेडछाड;महावितरणने 70 मीटर घेतले ताब्यात

सुशिलकुमार दळवी
पुर्णा,दि 17 ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी पूर्णा तालुक्यात वीज चोरी करणाऱ्याची तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या तपासणीत काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. यामुळे 70 वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतले आहेत. यात काही निष्पन्न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणच्या उपवस्थापकीय संचालक याच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने,अधीक्षक अभियंता टेंभुर्णी , कार्यकारी अभियंता गाडेकर , उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी, मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. आठवडाभरापासून राबविलेल्या धडक कारवाईत पुर्णा शहरातील वीजवाहिनीवरील ग्राहकांची तपासणी करण्यात येत आहे यावेळी 70 वीजग्राहकांचे मीटर मंद गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरील ग्राहकावर कंपनीच्या नियमाप्रमाणे कार्यवाही होणार आहे.

महावितरणने ताब्यात घेतलेल्या मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी केली जाणार आहे. तर आता नागरिकांच्या घरात पूर्वीचे जुने मीटर एवजी नवीन स्मार्ट डिजिटल मीटर लावले जाणार आहेत. अशा संशयीत मीटर मधील तफावत व संबंधितांनी चोरी केलेलील असल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे. यात काही आढळून आल्यास वीज युनिट नुसार त्यांना दंडाची नोटीस दिली जाणार असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Check Also

लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची दबाव गटाची मागणी

सेलू(प्रतिनिधी) पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिना झाला परंतू पुरेसा पाऊस परभणी जिल्ह्यात पडलेला नाही.सध्या …