31/03/26
Breaking News

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून,दोन मे पासून सुट्या

: यंदा राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे १५ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालनालयाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी यंदाच्या उन्हाळी सुटी व नवीन शैक्षणिक वर्षाबाबत आदेश जारी केला आहे. शैक्षणिक वर्ष २५-२६ अखेरच्या टप्प्यात आहे. बुधवारपासून एप्रिल सुरू होत आहे.

जिल्हा परिषद, सर्व माध्यमांच्या व सर्व संस्थांच्या शाळांमधीतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा संपणार आहेत. १ मेपर्यंत सर्व शाळांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. चालू शैक्षणिक वर्षाची अखेर होईल. नंतर शाळांना उन्हाळी सुटी सुरू होणार आहे.

शिक्षण संचालनालयाचे अधिकारी महेश पालकर, शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या आदेशानुसार पुढील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. विदर्भासह इतर काही भागांत हवामानाच्या परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला आवश्यक तो निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित सर्व मान्यताप्राप्त शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जून महिन्यातील वाढत्या तापमानाचा विचार करून १५ जून ते २१ जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी ७ ते ११.१५ या वेळेत भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ३० जूनपासून शाळा नियमित वेळेत सुरू करण्यात येणार आहेत.

Check Also

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही बंद

राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण …