सेलू(प्रतिनिधी)
पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिना झाला परंतू पुरेसा पाऊस परभणी जिल्ह्यात पडलेला नाही.सध्या पिके दमदार पावसाअभावी धोक्यात आली आहेत.त्यामुळे तातडीने लोअर दुधना धरणातून पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी दबाव गटाच्या वतीने आज दि 15 जुलै रोजी जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जायकवाडीतून कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने आभार व्यक्त करून त्याच धर्तीवर लोअर दुधना धरणातूनही पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
मात्र सेलू तालुक्यात देखील पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आहे. खरीपांच्या पिकांसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.सेलू तालुक्यात कापूस, सोयाबीन, तूर, मूग ई. खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पावसाअभावी ही पिके धोक्यात आली आहेत.त्यामुळे लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक अॅड. श्रीकांत वाईकर, गुलाब पौळ, इसाक पटेल,
ओमप्रकाश चव्हाळ, दिलीप मगर, सतिश काकडे,गणेश सोळंके, आबासाहेब भुजबळ,मुकुंद टेकाळे, लिंबाजी कलाल, लक्ष्मण प्रधान,
अॅड. योगेश सुर्यवंशी, अँड देवराव दळवे, अॅड. उमेश काष्टे, राजेंद्र केवारे, भारत रवंदळे, भारत झाल्टे, दत्तरावं कांगणे, रामचंद्र आघाव, सुधीर आघाव, जलाल भाई, अजित मंडलीक, विलास रोडगे, अँड रामेश्वर शेवाळे, भाऊराव सोनवणे, रामचंद्र कांबळे, रौफ भाई, राजाभाऊ, मोगल, नारायण पवार,उद्धव सोळंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.