परभणी,दिनांक 18
मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी करत आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी करण्याच्या विलंबावर आवाज उठवत खरेदी केंद्रावर सुवीधा,बारदाना साहित्य का देत नाहीत असा प्रश्न करत सरकारवर हल्लाबोल केला.
विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ.पाटील यांनी परभणीसह मराठवाड्यातील विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरले.अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी तळमळीने जिल्ह्यातील शेतीप्रश्न मांडत सरकारचे लक्ष वेधले.उर्जा,रस्ते,
शेतमालभाव,खरेदी,
शहरातील विकासकामे यावर त्यांनी आवाज उठवला.यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले,’आपल्या परभणी जिल्ह्यात व मराठवाड्यात कापसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. त्यामुळे मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी सभागृहात केली. जेणेकरून आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधिकचा भाव मिळेल.त्यामुळे कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करा अशी मागणी केली.
शेतमाल खरेदी केंद्राच्या सावळ्यागोंधळावर देखील त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.ते म्हणाले,शासकीय खरेदी केंद्रावर
कुठं बारदाना नाही, कुठं वजनकाटे बरोबर नाहीत, कर्मचारी कमी, गोडाऊन अपुरे असे अनेक प्रश्न धान खरेदीच्या निमित्ताने होतात व परिणामी फटका शेतकऱ्यांना बसतो.कापूस, हरभरा, सोयाबीन खरेदीचं उद्दिष्टच पूर्ण होत नाही. १४ लाख टनाचं ध्येय ठरवलेलं असताना सोयाबीन खरेदीचं फक्त ५५% उद्दिष्ट पूर्ण झालं.या अडचणी दूर करून शेतमाल सुरक्षिततेची हमी शासनाने द्यावी.अशी मागणी केली.