परभणी,दि 01 ः
राजु शेट्टी यांनी शक्तीपिठ महामार्गाच्या विरोधात १२ जिल्ह्यात पुकारलेल्या चक्का ज्याम आंदोलनात आज परभणी जिल्ह्यातील शक्ती पिठ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहे. पिंगळी या गावातील परभणी ते नांदेड जाणारा राज्य मार्ग शेतकऱ्यांनी उडवून धरला ज्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होते तिथूनच शक्ती पिठ महामार्ग जाणार आहे. तिथेच आंदोलनास सुरुवात झाली एकीकडे लोक सभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवा मुळे राज्य सरकार आपली छबी राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरेत चांगली करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज मुक्त करणार आहोत असे सांगितले त्यावेळेस होत असलेल्या शक्ती पिठ महामार्गाला विरोध लक्षात घेत आम्ही हा शक्ती पिठ महामार्ग रद्द करू असा शब्द त्यावेळेस चे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यावेळेस उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. शेतकऱ्यांच्या मन: प्रमाणे निर्णय घेतल्या मुळे राज्यातील शेतकऱ्यांनी यांना भर भरून मत दिले शिंदे यांना बाजुला सारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि हे राज्य आपल्या घरच आहे या पद्धतीने निर्णय येथील जनतेवर लादत आहेत. त्यातलाच एक म्हणजे शक्ती पिठ महामार्ग जो १२ जिल्ह्यातून जातो आहे. आणि तेथील सर्व शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. तरी सुद्धा गृह खाते आपल्या हातात असल्याने पोलिसांना आपण कसेही वापरू शकतो अशी त्यांची धारणा आहे. पण काहीही झाले तरी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पोर यांची दादागिरी खपऊन घेणार नाहीत. अशी भूमिका घेत
हा रास्ता रोको आंदोलन तो पर्यंत सुरू राहील जोपर्यंत पूर्णा तालुक्यातील सुरवाडी व सोनपेठ तालुक्यातील कानेगाव या गावात मोजणीसाठी गेलेले अधिकारी व पोलिस हे परत येनार नाहीत तो पर्यंत हा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात येनार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. ज्या गावात मोजणी होती तिथे सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यावेळेस जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत मोजणीला गेलेले अधिकारी माघारी बोलाऊन घेतले. त्यानंतर आंदोलन तीन तासांनी माघारी घेण्यात आले. आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरच पंगत धरून दुपारचे जेवण केले. या आंदोलनात परिसरातील शक्ती पिठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बैल गाड्या सह रस्त्यावर उतरले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने, काँग्रेस पक्षाचे अमोल जाधव, सय्यद कलीम भाई, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, शिवा दामोदर, गजानन गरुड, उद्भव गरुड, अंकुश गिरी, रामेश्वर पुरी, शंकर दामोधर, सुरेश आगलावे, कैलाश राष्ट्रकूट, शिवसांभ दामोदर, रामेश्वर साखरे, पांडुरंग साखरे, दिलीप दामोदर यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पोखर्णी फाटा येथे आंदोलन
परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्याकडून रस्ता रोको करण्यात आला.
मंगळवार रोजी २ दोन वाजल्यापासून रास्त रोखला सुरुवात करण्यात आली यावेळी सरकार विरोधात मोठमोठ्याने घोषणा देण्यात आल्या हा रास्ता रोको दीड तास करण्यात आला या रास्तोरोको दरम्यान मोठ्या संख्येने दुतर्फा वाहनांची रांग लागली होती यावेळी पावसाने हजेरी लावली पडत्या पावसात शेतकऱ्यांनी रस्त्यावरच बसून या रस्त्या विरोधात आंदोलन केले या आंदोलनासाठी पोखरणी आंबेटाकळी दैठणा ब्रह्मपुरी साळापुरी इंदेवाडी येथील अनेक शेतकरी सहभागी झाली होती यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता