12/07/25
Breaking News

‘शब्दांचं धन’ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे – डॉ. अशोक खेत्री

सेलू ( प्रतिनिधी )
अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे ‘ शब्दांचं धन ‘ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख पिंपळपानाच्या साथीने उमलतो. मारूती चितमपल्ली यांना उमेदीच्या काळात सावलीसारख्या अनेक थोर व्यक्ती भेटल्या. त्यांच्या सोबतच्या आठवणींना या पुस्तकातून मारूती चितमपल्ली यांनी उजाळा दिला आहे. असे प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक खेत्री ( वडवणी ) यांनी केले. त्यांनी मारूती चितमपल्ली यांच्या ‘ शब्दांचे धन ‘ या पुस्तकावर स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ एक दिवस एक पुस्तक’ या मासिक उपक्रमाचे २९ वे पुष्प गुंफले. जंगल, वृक्ष, प्राणी, पक्ष्यांवर निस्सीम प्रेम करणारे मारूती चितमपल्ली यांचे नुकतेच निधन झाले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने ‘ एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय ढाकणे हे होते. कार्यक्रमात डॉ. गंगाधर गळगे यांनी मराठी विश्वकोशाची १४ खंड, तर कवी माधव गव्हाणे यांनी आपल्या ग्रंथ संग्रहातील ५८ पुस्तके ग्रंथालयास भेट दिली. प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. तर नारायण इक्कर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, भाऊ शिंदे, प्रा. इच्छा शिंदे, गंगाधर गुंजकर, डॉ. शरद ठाकर, नागेश देशपांडे, शिक्षक, प्राध्यापक, वाचक यांची उपस्थिती होती.

Check Also

वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त ठरलां..परभणी मार्गे धावणार

परभणी,दि 09 ः भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसने …