शिंदे गटातील शपथ घेतलेल्या मंत्र्याची तब्येत बिघडली

0 17

पुणे, 11 ऑगस्ट : शिंदे सरकारचा नुकताच शपथविधी सोहळा पार पडला आहे. आज खातेवाटपाची बैठक होणार आहे. पण, त्याआधीच शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली आहे. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना अचानक सावंत यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तानाजी सावंत यांना तातडीने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आज खातेवाटपाची बैठक होणार आहे. त्यामुळे सावंत हे या बैठकीला गैरहजर राहणार आहे.दरम्यान, शिंदे सरकार बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. आता दोन दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे नाव घेत नाही. कोणते खाते कुणाला दिले जाणार, याबद्दल बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. प्रत्येक मंत्र्यांना प्रत्येकी दोन-तीन खात्यांचे पर्याय विचारण्यात आले आहे. ते पर्याय मंत्र्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाला पाठवले देखील आहेत. मात्र अद्याप कोणत्या मंत्र्याला कोणती खाते द्यायची हे अद्याप कळवण्यात आले नाही.५ ॲागस्टपूर्वी खाते वाटप झाल तर पालक मंत्री नेमता येईल आणि प्रत्येक जिल्हयात ते ध्वजारोहणासाठी उपस्थित राहू शकतात. त्याच प्रमाणे १७ ॲागस्टपासून राज्य विधीमंडळाच पावसाळी आधिवेशन सुरू होत आहे. आधिवेशनापूर्वी किमान काही दिवसआधी खाते वाटप झाले तर मंत्र्यांना आपल्या विभागाचा आढावा घेता येऊ शकतो. जेणेकरून अधिवेशनात विरोधकांना उत्तर देऊ शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराला 39 दिवस लागले खाते वाटपeसाठी किती कालावधी लागणारं हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!