28/02/26
Breaking News

स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सवच -नगराध्यक्ष मिलिंद सावंत

सेलू(प्रतिनिधी)
स्नेहसंमेलन म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाचा क्षण असतो .त्यांनी स्नेहसंमेलनानिमित आयोजित विविध स्पर्धेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून विजयाचे परितोषक मिळवण्याचा हा एक आंदोस्तवच असतो असे प्रतिपादन सेलू नगर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी विवेकानंद विद्यालयात आयोजित स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले .

येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात इयत्ता
५वी ते८वी तील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सेलू शहराचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत तसेच शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी ,मु.अ.नामदेव एकशिंगे ,गजानन साळवे,अनिल कौसडीकर,आश्विनी पावसे,शंकर राऊत ,रुपाली सपकाळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पुढे बोलताना मिलिंद सावंत म्हणाले की,स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ असते.मनोरंजन व उत्साहाचा सुंदर मिलाप म्हणजे स्नेहसंमेलन असते.
विद्यार्थ्यांनी मनोरंजना बरोबरच स्पर्धा परीक्षांना सक्षमपणे सामोरे जाण्याचे असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात शेतकरी गीत,आम्ही शिवकन्या, काठी न घोंगड,श्रीकृष्ण जन्माष्टमी ,सरस्वती वंदना आदी गीतांवर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी व मोहिनी लोणीकर यांनी केले.कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती.

Check Also

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी …