पूर्णा,दि 07 ः
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे माहेरघर जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, देऊळगाव दुधाटे ता.पूर्णा जि. परभणी येथे दिनांक-06 ऑगस्ट 2025 रोजी एक राखी सैनिकांसाठी..तुमच्या-आमच्या रक्षणासाठी हा उपक्रम मोठ्या हर्षोल्हासने राबविला.विशेष म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतःच्या खाऊचे पैसे वाचवून खरेदी केलेल्या साहित्यातून या राख्या बनविल्या आहेत.
इयत्ता-1 ली ते 7 वीचे शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले.त्यांनी स्वहस्ते आपल्या भारतीय सैनिक बांधवांसाठी 289 राख्या अगदी आनंदाने बनविल्या.भारतीय शूरवीर सैनिकांसाठी राख्या बनविण्याचा आंनद सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.व दुसरे साध्य म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण मिळाले.
या उपक्रमासाठी लागणारे साहित्य श्री आबनराव पारवे यांनी उपलब्ध करून दिले.आता हे या राष्ट्रीय उपक्रमाचे चौथे वर्ष आहे.गटशिक्षणाधिकारी श्री बालाजी कापसीकर साहेब,केंद्रप्रमुख श्री प्रमोद आंबोरे,शाळेचे मुख्याध्यापक श्री नामदेव दुधाटे यांनी प्रोत्साहन दिले.शाळेचा सर्वांगीण विकास करणारे उपक्रमशील शिक्षक श्री बळीराम कदम,श्री गंगाधर लांडे ,श्री मुंजादेव मुंडे,श्री शत्रूग्न मिराशे,श्री शिवकुमार बोडगमवार यांनी लागणारे सर्व सहकार्य केले. श्रीमती वैशाली शिशोदे यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती व समस्त गावकरी मंडळींचे अनमोल सहकार्य लाभले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांची राष्ट्रभक्ती जागृत झाली.आपले सैनिक अहोरात्र ऊन,वारा, पाणी या नैसर्गिक असो अथवा मानवनिर्मित आपत्ती असो यातून आपले रक्षण करतात पण त्यांना उत्सवासाठी घरी येणे शक्य नसते मग त्यांच्याविषयी आपुलकी,जिव्हाळा,आदर,बंधुप्रेम व्यक्त करण्याची संधी आमच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपलब्ध झाली.देशाच्या सैनिकांसाठी अश्या उपक्रमात सहभागी होता आले,याचे आम्हाला,आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना फार मोठे समाधान वाटत आहे व स्वतःला आम्ही धन्य मानत आहोत.
Shabdraj www.shabdraj.com