28/02/26
Breaking News

वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची दयनीय अवस्था, वीरशैव संघटनेची तक्रार

सेलू ( प्रतिनिधी )
येथील सर्व्हे नंबर ३३ मध्ये सातबारा नोंदीनुसार ८० आर जमिनीवर वीरशैव लिंगायत समाजाची शिवा वीरशैव मोक्षधाम – दफनभूमी आहे .परंतु सध्या या दफनभूमी ची अत्यन्त दुरावस्था झाली असून शहरातून व कट्टलखान्यातून येणाऱ्या नाल्याचे पाणी दफनभूमीत घुसत असल्यामुळे अंत्यसंस्कार करणे जिकरीचे बनत असून प्रेताची विटंबना होत आहे .तरी सदरील दफणभूमीची दुरुस्ती करून द्यावी नसता सुयोग्य अशी दोन एकर जमीन देण्याची मागणी अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष नगर परिषद सेलू यांच्या कडे नी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

शहरात वीरशैव लिंगायत समाजाची ४ ते ५ हजार लोकसंख्या असून त्यांच्या साठी ही जागा दफनभूमी साठी देण्यात आली आहे .परंतु दफनभूमीत नाल्याचे सांडपाणी घुसून जागेत दलदल व जागोजागी खड्डे पडतात. अंत्यसंस्काराच्या वेळी खड्डा खोदला की पाणी निघते .त्यामुळे अंत्यविधी करणे जिकरीचे बनून प्रेताची देखील विटंबना होते .सदरील प्रकरणी गेल्या १५ वर्षांपासून समाजाच्या वतीने तत्कालीन मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली व हा प्रश्न प्रलंबीत आहे .तरी नवीन पर्यायी जागा मिळेपर्यंत सदरील जागा पूर्ण पणे समतल करून द्यावी .तसेच दोन्ही नाल्याचे पिचिंग करून स्मशानभूमीत पाणी घुसणार नाही याचा कायमचा बंदोबस्त करावा .तसेच अंतर्गत रस्ते व संरक्षक भिंत बांधून द्यावी .तसेच वालुर रोड कडून स्मशानभूमीत येणारा अगोदरचा रस्ता अतिक्रमण काढून मोकळा करून दयावा . तसेच लाईट व हातपंपाची व्यवसथा करण्यात यावी .प्रवेशद्वाराजवळ गेट करून सर्व परिसराचे सुशोभीकरण करून देण्यात यावे .आदी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत .
यावेळी नगरसेवक कपिल फुलारी ,गणेश सवणे यांच्या सह संघटनेचे निजलींगप्पा तरवडगे ,शिवकुमार नावाडे ,सुजित मिटकरी ,प्रकाश साखरे ,संतोष कामटे ,बबनअप्पा झमकडे तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न यावर्षी तरी कायमचा मार्गी लागेल .अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली .

Check Also

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी …