सेलू ( प्रतिनिधी )
शहरातील रायगड कॉर्नर ते परभणीरोड, नूतन महाविद्यालय ते बाबासाहेब मंदिर रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका हे सर्व रोड अत्यंत रहदारीचे आहेत या रोडवर चार शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग व नागरी वसाहत आहेत या रोडवर लहान लेकरं वयोवृद्ध नागरिकांचा वावर असतो दुचाकी व चार चाकी वाहनधारक या रोडवरून अत्यंत बेदरकारपने वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघात होऊन अनेकांनी आपले जीव गमावले आहेत व अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. या रस्त्यावर शाळा व महाविद्यालय असल्यामुळे अनेक विद्यार्थी सायकलवर येणे जाणे करतात पण या भरधाव वाहनाचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी तात्काळ या तिन्ही मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे .नसता श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठान सेलू च्या वतीने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देखील निवेदनात देन्यात आला आहे .
यावेळी जयसिंग शेळके, गणेश शेवाळे, विनोद धापसे, कृष्णा पडघन, अक्षय सोळंके,पवन धुमाळ, आकाश इघवे, करण ढवळे आदि उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com