11/07/25
Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे यश

सेलू,दि 11ः
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालय सेलू येथील ०६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
इयत्ता ५ वी तुन चि. आदित्य गिरी (जिल्ह्यात ५१ वा ), कु.अनन्या कोल्हे (जिल्ह्यात ८५ वी),चि. आरुष ताठे (जिल्ह्यात ८७ वा) शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.इयत्ता ८ वी तुन रुद्र गुंगाणे (जिल्ह्यात ४३वा ),दीपक काष्टे (जिल्ह्यात ८० वा),युवराज कुमार (जिल्ह्यात ८७वा) शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांना रागिणी जकाते ,विजय चौधरी ,विनोद मंडलिक ,शंकर राऊत ,काशिनाथ पांचाळ ,अनिकेत भिलेगावकर ,चंदू कव्हळे ,सोनाली जोशी यांनी मार्गदर्शन केले.स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी ,मु.अ.शंकर शितोळे ,अनिल कौसडीकर यांनी अभिनंदन केले.

Check Also

अन्नसुरक्षा योजनेतील उदीष्ट संख्या वाढवा- आ.डॉ.राहुल पाटील यांची मागणी

परभणी,दि 09ः अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा …