: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता केली. त्यांच्या या घोषणेमुळे विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.
यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ‘अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर ‘जय गुजरात’ ची गर्जना केली. काय करायचं? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?’ असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे.
शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले – पेडणेकर
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदेंवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘शिंदे स्वता:ला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात. पण आज ते अमित शहा यांच्यासमोर लाचार कसे झाले हे त्यांनी दाखवलं. हिंदीसोबत आता गुजराती शिकण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देत आहात काय? बाळासाहेबांचे विचार म्हणून तुम्ही पुढे येता बाळासाहेबांचा जय गुजरात कधीच नव्हता. ज्यांचा जन्म महाराष्ट्र ते जय गुजरात कसं बोलतील असा सवालही पेडणेकर यांनी केला आहे.
शिंदे साहेबांवर शंका घेण चुकीचं – योगेश कदम
याबाबत बोलताना मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं की, ‘एकनाथ शिंदे साहेबांवर शंका व्यक्त करण म्हणजे आकाशावर थूंकण आहे. शिंदे साहेबांवर शंका घेण चुकीचं आहे. ज्या व्यक्तीने हिंदूत्वाचं सरकार आणलं त्याच्यावर शंका घेण चुकीचं.’