VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे, कारण यात गुंतलेले इतर लोकही तितकेच प्रभावशाली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्या राजीनाम्यासाठी मी पंतप्रधान मोदींना ईमेलच्या माध्यमातून पत्र पाठवलं आहे. राहुल गांधी यांनीही हा विषय आपल्या हाती घ्यावा आणि या मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आम्हाला साथ द्यावी, असेही ते म्हणाले.
दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?
दरम्यान, रोहित पवार यांनी दिल्लीत मोठं वक्तव्य केलं आहे. दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात? असा थेट सवाल त्यांनी दिल्लीत केल्याने त्यांचा नेमका रोख कोणाकडे? असा सवाल उपस्थित झाला आहे. दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात? दादा त्यांचे मित्र होते, अमित शाह, नरेंद्र मोदींनी यात लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. ते पुढे म्हणाले की, मुंबईत या कंपनीने नवं विमान सिंगापूरहून विकत घेऊन आणलं तेव्हा नारळ फोडायला एक मोठे नेते गेले होते. अजित पवारा त्यांचे मित्र होते हे लक्षात ठेवलं पाहिजे, असेही रोहित पवार यांनी सांगितलं.
रोहित पवार म्हणाले की, आम्ही या विषयात जितके खोलवर जात आहोत, तितके हेच समोर येत आहे की VSR कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे. यात सत्तेतील लोक, राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि यामागे जे पावरफुल लोक आहेत, ते या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. वैमानिकावर दबाव: मुख्य वैमानिकावर दबाव टाकून किंवा त्याला ब्लॅकमेल करून काही कृती करायला लावली असावी, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. अहमदाबादमधील क्रॅशच्या तपासातील काही अहवालांचा संदर्भही त्यांनी यासाठी दिला.
व्हीएसआर कंपनी व तेदेपाचे साटेलोटे
रोहित पवार म्हणाले, भारताचे उड्डयण मंत्री तेदेपाचे आहेत. त्या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबातील एका सदस्याची एक वित्तीय संस्था आहे. या वित्तीय संस्थेने व्हीएसआर कंपनीत गुंतवणूक केली आहे. तुमच्याच घरचे लोकं व्हीएसआरला पैसे लावत असतील, रोहित सिंह (व्हीएसआरचा संचालक) च्या लग्नाला जात असाल. तुमचे त्यांच्याशी आर्थिक संबंध असतील, तर मग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी होईल? तेदेपाशी संबंधित असणाऱ्या एका उद्योगपतीचेही विमान व्हीएसआरकडे आहे. भारतातील सर्वात लेटेस्ट विमानाचाही संबंध या कंपनीशी आहे.
तेदेपा व व्हीएसआरचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. याच पक्षाचा एक खासदार देशाचा उड्डयण मंत्री आहे. त्याच्या नेतृत्वात अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी कशी पारदर्शक होईल असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तेदेपाच्या उड्डयण मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी आपल्या पक्षाचे व्हीएसआर कंपनीशी असणारे संबंध लपवून ठेवले. ते डीजीसीएच्या माध्यमातून या प्रकरणाच्या तपासात मॅन्युप्युलेशन करू शकतात. कागदपत्रांची हेराफेरू करू शकतात. त्यामुळे अजित पवारांना न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची गरज आहे.
व्हीएसआर कंपनीत महाराष्ट्रातीलही काही लोकांचा समावेश आहे. हे लोक खूप पॉवरफूल आहेत. त्यामुळेच आम्ही या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चौकशीची मागणी करत आहोत, असे ते म्हणाले.
पायटला कुणीतरी ब्लॅकमेल करत होते काय?
रोहित पवार यावेळी सादरीकरण करताना म्हणाले, आजच्या सादरीकरणात यापूर्वीच्या पत्रकार परिषदेहून वेगळी माहिती आहे. अजित पवारांच्या अपघातावेळी विमानाचा एकच स्फोट झाला नव्हता. अनेक स्फोट झाले होते. या प्रकरणी वैमानिकावर दबाव टाकला असेल किंवा त्याला ब्लॅकमेल करून ही घटना घडवली असेल. अहमदाबाद विमान अपघातावेळी बाह्य तपास यंत्रणांनी पायलटकडे बोट दाखवले होते. या प्रकरणी विश्लेषण केले आहे. व्हीएसआर कंपनीच्या संचलनात अनेक दोष आहेत. त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. तसेच या मागे कुणीतरी असण्याचीही शक्यता आहे.
नागरी उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्या घ्या – रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, या प्रकरणी कटकारस्थानाचा विचार केला. तर या प्रकरणी दोन प्रकारचे षडयंत्र आहे. एक राजकीय व दोन कमर्शियल. यापैकी एकाचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. विमान अपघाताला व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे त्या कंपनीला कुणी पाठिशी घालत असेल, तिला वाचवत असेल तर ते ही एक षडयंत्र असू शकते. या कंपनीच्या मागे खूप शक्तिशाली लोक आहेत. डीजीसीएचे अधिकारी यामागे आहेत. त्यामुळे आपल्याला अजित पवारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर महाराष्ट्राचे लोक, या देशातील जनता या प्रकरणी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यांचा आवाज इथपर्यंत पोहोचत आहेत.
या प्रकरणी न्याय करायचा असेल तर या देशातील सर्वात पॉवरफूल लोकांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच अजित पवारांना न्याय देऊ शकतात. कारण, या प्रकरणात हात असणारे खूप शक्तिशाली आहेत. त्यामुळे देशातील सर्वात ताकदवान असणाऱ्या या दोन नेत्यांनीच (मोदी-शहा) या प्रकरणाच्या तपासात लक्ष घालण्याची गरज आहे.
मी आज या प्रकरणी एक पत्र पंतप्रधान मोदींना पाठवणार आहे. कारण, मला त्यांच्या भेटीची वेळ मिळेल किंवा नाही हे माहिती नाही. पण आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या नागरी उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मोदी व शहांकडे आम्ही ही मागणी करत आहोत. एवढेच नाही तर आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही हा विषय आपल्या हातात घेण्याची विनंती करत आहोत. या प्रकरणी तेदेपाच्या उड्डयण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
Shabdraj www.shabdraj.com