18/07/25
Breaking News

महिलांनी मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा बाळगू नये-डॉ. आशा चांडक

परभणी,दि 18 ः
‘महिलांनी मासिक पाळी संदर्भात वैयक्तिक जीवनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा बाळगू नये’ असे प्रतिपादन डॉ सौ आशा चांडक यांनी केले.
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाच्या समन्वयक डॉ. सौ आशा पवन चांडक यांचे किशोरवयीन मुली व महिला, माता पालक यांच्यासाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला डासाळा ता सेलू येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत 6 वी ते 10 वी तील किशोरवयीन मुली, गावातील महिला, माता पालक व शिक्षिकांची उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक एचएआरसी संस्थेच्या मासिक पाळी समुपदेशन तज्ञ डॉ आशा पवन चांडक, सौ. सीमा शिखरे, सरपंच सौ. प्रियंका बोंबले, मुख्याध्यापक श्री मधुकर काष्टे, डॉ सौ. शितल गजमल, डॉ सौ. आरती गवई, सौ. माधवी डख, सौ. भाग्यश्री करवा व शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती.
डॉ.आशा चांडक यांनी कार्यशाळेला संबोधित करताना किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल,मासिक पाळी व्यवस्थापन,पाळी विषयीचे समज,गैरसमज,पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता,सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा वापर,त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, व्यायाम आदी विषयी मार्गदर्शन केले.

Check Also

लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची दबाव गटाची मागणी

सेलू(प्रतिनिधी) पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिना झाला परंतू पुरेसा पाऊस परभणी जिल्ह्यात पडलेला नाही.सध्या …