पाथरी,दि 17 ः
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. यातून महिलांची मानसिक खच्चीकरण तसेच महिला प्रगतीला बाधा निर्माण होत आहे. महिलांमध्ये जागृती होण्यासाठी त्यांना संरक्षण देणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याची माहिती होणे आवश्यक आहे. महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी महिलांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी जिल्हा निरीक्षक सौ. संगीताताई तूपसागर यांनी प्रतिपादन केले.
दि.17 जुलै 2025 रोजी शहरातील शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, महाराष्ट्र
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सक्षम तू- महिला जनजागृती शिबिराच्या उद्घाटकीय स्थानावरून त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कार्य करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणाला आपण अधिक महत्त्व देतो तसेच सर्वच क्षेत्रामध्ये महिला सक्षमपणे कार्य करत आहेत, महिलांवर होत असलेल्या अन्यायाला महिलांनी दाद मागावी, शासन व समाज महिलांच्या सोबत आहे महिलांनी सक्षमपणे पुढे यावे असे परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांनी प्रास्ताविकातून विचार मांडले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उप पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट , पाथरी पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ नरके तसेच दामिनी पथक प्रमुख प्रीतीताई दुधवडे, पाथरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षा गीताताई कुटे, पाथरी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा रेणुकाताई सावळे, सुनीताताई राखुंडे , लताताई गरड,प्राचार्य किशन डहाळे, मुख्याध्यापक नवनाथ यादव आदी उपस्थित होते.
या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले पाथरी पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट यांनी पोक्सो कायदा, कौटुंबिक हिंसा, महिला संरक्षण कायदे, अत्याचाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक, सायबर क्राईम, टोल फ्री क्रमांक इत्यादी कायदेविषयक बाबींचे सविस्तर विवेचन केले.
पाथरी पोलीस स्टेशन पाथरी येथील एपीआय सोमनाथ नरके यांनी विशेष करून शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायदेविषयक बाबी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आवाहन केले.
या एक दिवशीय शिबिराचे सूत्रसंचालन आसाराम सोनवणे तर आभार प्रदर्शन सुनिताताई राखुंडे यांनी केले. कार्यक्रमास महिला, शालेय विद्यार्थिनी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
