परभणी,दि 25 ः
हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाणारी चारधाम यात्रा परभणीतील काही भाविकांनी नुकतीच पूर्ण केली आहे. यात्रा पूर्ण करून सोमवारी (दि.23) दुपारी परतल्यानंतर परभणी रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
परभणी येथून दिनांक 8 जूनला सर्व भाविक रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाले होते. दिल्लीहून खाजगी आराम बसने ते सर्वजण हरिद्वारला पोहोचले. त्यानंतर त्यांची चार धाम यात्रा सुरू झाली.
चार धाम यात्रा ही उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात असलेल्या चार पवित्र तीर्थक्षेत्रांची असून यात यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ – एक पवित्र तीर्थक्षेत्र यांचा समवेश आहे. यमुना, गंगा, मंदाकिनी आणि अलकनंदा यासारख्या पवित्र नद्यांचे उगमस्थान म्हणून या तीर्थक्षेत्रांना पूजनीय मानले जाते. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचे आहे. चार धामांपैकी केदारनाथ आणि यमुनोत्री धाम पोहोचण्यासाठी कित्येक किलोमीटर लांबीचं अंतर पार पडावं लागतं. गंगोत्री आणि बद्रीनाथला सहजपणे पोहोचता येतं. परभणीतील भाविकांनी ही यात्रा उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र स्थळांना भेट देऊन पूर्ण केली. यामध्ये सौ.ममता महेश सोनी, सौ.शीतल सत्येन गुंडलवार व त्यांच्या रुद्राणी व इरा गुंडलवार ह्या मुली, सौ.मीनाक्षी संदीप भंडे, सौ.कृष्णा कमल भंडे, सौ.योगिता सुभाष भुते, सौ.भारती सुशील शर्मा, सौ.मीना रामवल्लभ उपाध्याय, सौ.प्रतिभा हालगे व त्यांची 5 वर्षांची मुलगी आरोही सुशांत हालगे यांनी चार धाम यात्रा पूर्ण केली. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील नांदेड, जालना जिल्ह्यातील काही भाविक होते. परभणी स्थानकावर ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट सीताराम गुंडलवार, शंकर गुंडलवार, निलेश भंडे, पंकज भंडे, रुपेश सोनी, सुशांत हालगे, संजय सोनी, सौ.सुरेखा मालीवाल, राखी सोनी, श्री.भुते, बाळू उपाध्याय, विवेक शर्मा, महेश कांकरिया आदींनी सर्व यात्रेकरूचे पुष्पहार घालून व पेढे भरवून स्वागत केले. त्यानंतर श्री पेडा हनुमान मंदिरात झालेल्या सत्कार व धार्मिक पूजा कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योजक नंदलाल सोनी, ॲड.अशोक सोनी, सुजित काबरा, बालू झांजरी, सुनील कालानी, सुरेश कालानी, आशिष लोया, संजय मुंदडा, धीरज सोमाणी, आनंद काबरा आदी उपस्थित होते.
