23/08/26
Breaking News

जीर्ण झालेल्या महावितरणच्या तारांचा नागरिकांच्या जीवितास धोका,केबल टाकण्याची मागणी

सेलू ( नारायण पाटील )
शहरात बऱ्याच भागात महावितरणच्या विजेच्या तारा जीर्ण झाल्या असून लोम्बकळलेल्या आहेत .त्यामुळे अशा तारा स्पार्किंग तुटतात व त्याचा धोका नागरिकांच्या जीवितास होऊ शकतो .
येथील महेश नगर भागात लक्ष्मीनारायण रुग्णालय असून बाजूलाच मेडिकल व केशवराज बाबासाहेब संस्थानचे मंगल कार्यालय देखील आहे .त्यामुळे या भागात दिवसभर रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची व बाजूलाच असलेल्या केशवराज नगर मधील नागरिकांची देखील सारखी वर्दळ चालू असते . आतापर्यंत या भागातील तारा चार ते पाच वेळेस तुटून रस्त्यावर पडल्या .परंतु सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे कांही अनुचित प्रकार घडला नाही .परंतु येथील रुग्णांची व नातेवाईकांची वर्दळ लक्षात घेता .कधीही मोठा अनर्थ घडू शकतो .वारंवार या तारांची केवळ दुरुस्ती केली जाते .परंतु पुन्हा वारे जोरात सुटले की ,तारांची स्पर्किंग होऊन हाच प्रकार वेळोवेळी घडतो .नागरिकांनी कल्पना देऊन देखील महावितरणचे अधिकारी या कडे कानाडोळा करतात .तार तुटून विजेचा शॉक बसून एखाद्याच्या जीव गेल्यानंतरच महावितरण याबाबत योग्य ती कार्यवाही करणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे .
वारंवार दुरुस्ती करून देखील देखील तार तुटत असल्यामुळे नागरिकांची अथवा तेथील वाहनांची नुकसान होऊन अपघात होऊ नये यासाठी महावितरण ने याभागात केबल टाकून कायमस्वरूपी बंदोबस्त करून पुढील होणार अनर्थ टाळावा अशी मागणी लक्ष्मीनारायण हौस्पिटल चे डॉ किशोर जवळेकर यांनी महावितरणच्या अभियंत्याकडे केली आहे .

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …