24/10/26
Breaking News

सेलूत रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

सेलू ( प्रतिनिधी )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,शाखा सेलूच्या वतीने विजया दशमी उत्सव २०२६ निमित्त शस्त्रपूजन व पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.24) रोजी करण्यात आले आहे .
शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरु व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराज ,मंदिर येथे सकाळी ८.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मा श्री राजेंद्रजी कोळपे (सह प्रांतप्रचारक ,देवगिरी प्रांत )हे राहणार असून सेलू येथील प्रसिद्ध स्त्रीरोग चिकिस्तक डॉ अनुपमा जवळेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तरी सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून राष्ट्रभक्ती ,सामाजिक एकात्मता आणि संघटनशक्तीप्रती असलेल्या आपल्या निष्ठेची साक्ष द्यावी .असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Check Also

निवृत्तीनंतर आत्मिक समाधानाची गरज -भास्करराव कुलकर्णी मसलेकर

सेलू.. प्रतिनिधी प्रत्येक माणसाच्या जीवनात जीवन जगत असताना कौटुंबिक व भौतिक गोष्टींमुळे आनंद मिळतो . …