गंगाखेड, प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा
नगरसेवक तथा गटनेते क्षितीज चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, रोजी सायंकाळी ७ वाजता गंगाखेड येथील गोदातट घाटावर ‘कोजागिरी संध्या’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास गंगाखेड व परभणी परिसरातील श्रोते, अभ्यासक विचारवंत कार्यकर्ते आणि मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते होणार असून, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मुख्य वक्त्या म्हणून प्रा. गुंजन पाटील उपस्थित लक्षणीय राहणार असून, विधान परिषद सदस्य सईद भाई खान आणि परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय वातावरणात आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून स्नेह, आपुलकी आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात येणार आहे. गोदातट घाटावर रंगणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विविध मंडळांचा संयुक्त पुढाकार
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी, वैष्णोदेवी नवरात्र महोत्सव, जय नृसिंह गोविंदा पथक, जय मल्हार युवक मंडळ, वकील वाडीचा राजा गणेश मंडळ, जनाई युवक मंडळ, गोदावरीचा राजा गणेश मंडळ, बालवीर गणेश मंडळ, जगदंब मशाल यात्रा आणि सर्व मित्र परिवार यांच्या संयुक्त पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता गोदातट घाट, गंगाखेड
या ‘कोजागिरी संध्या’ सोहळ्यास नागरिकांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com