सेलू ( प्रतिनिधी )
येथील अत्यंत पुरातन असलेल्या व शेरे परिवाराचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्र महोत्सव नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला .यामध्ये दररोज देवीची महापूजा, आरती ,नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य वाणी मधून देवि भागवत तसेच हरिपाठ ,भजन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले .
या नवरात्र महोत्सवाची सांगता दि २५/१०/२६ रविवार रोजी होणार असून सकाळी ११ते १ यावेळेत गुरुवर्य ह भ प नामदेव महाराज ढवळे चारठणकर यांचे कीर्तन होणार असून दुपारी १ ते ३ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
सायंकाळी ७ वाजता जगदंबा मातेची भव्य मिरवणूक ( छबिना ) काढण्यात येणार आहे .यामध्ये कवड्याच्या माळा गळ्यात घालून हातात पोत घेऊन आराधी पुरुष व महिला सहभागी होणार आहेत .तसेच पुरुष व महिला भक्त देखील पारंपरिक वेषात सहभागी होणार आहेत .वाजंत्री व फटाक्यांच्या अतिषबाजीत ही मिरवणूक देवीच्या मंदिर पासून निघून शहरातील प्रमुख मार्गाने रात्री उशिरा परत देवी मंदिर मध्ये परत येणार आहे .
तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन जगदंबा देवी नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .
Shabdraj www.shabdraj.com