24/10/26
Breaking News

अंजनवाडा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

 औंढा नागनाथ प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे अंजनवाडा येथील सम्राटनगरात २३ ऑक्टोबर रोजी ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी आयोजित भीमसंगीत रजनीत विविध भीमशाहिरांनी बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा समितीचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे व उपाध्यक्ष ज्ञानबा घोंगडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

सायंकाळी आयोजित भीमसंगीत रजनीचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोविंद भारशंकर, एंड मधुकर इंच्चेकर, दिनकर लोणकर, रामभाऊ गायकवाड, नितीन बार्हाटे, भारती राऊत, तेजस्विनी पांडववीर, स्वराजली पाईकराव, संगीता खांदळे, प्रकाशराव धबडगे, शेषेराव कुर्हे, भगवान वाघमारे, भीमराव वाघमारे, मधुकर घोंगडे, सुधाकर घनसावंत, महेंद्र नागरे व सोनू घोंगडे आदी भीमशाहिरांनी बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला.

यावेळी सरपंच यशोदा वामन घोंगडे, गंगाराम घोंगडे, नारायण घोंगडे, प्रभाकर घोंगडे, गौतम घोंगडे, डिंगाबर घोंगडे, नागनाथ घोंगडे, भीमराव घोंगडे, असंघ घोंगडे, विश्वनाथ घोंगडे, चंद्रमुणी घोंगडे, कपिल घोंगडे, राहुल घोंगडे, मिलिंद घोंगडे आदींसह सम्राटनगरातील नागरिक व धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

गंगाखेडमध्ये रविवारी ‘कोजागिरी संध्या,गुंजन पाटील यांची राहणार उपस्थिती

गंगाखेड, प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा नगरसेवक तथा गटनेते क्षितीज चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, …