24/10/26
Breaking News

हिंगोलीत 30 ऑक्टोबर रोजी निमंत्रितांचे कवी संमेलन

हिंगोली,दि 24 (प्रतिनिधी)ः
सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोली व साहित्य सृष्टी फाउंडेशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने  शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृह येथे 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रमुख कवी म्हणून. प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील जळगावकर, प्रसिद्ध कवयित्री सिंधुताई दहिफळे, प्रसिद्ध कवी नारायण पुरी, प्रसिद्ध साहित्यिक बबन शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
या कवी संमेलनाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक गायकवाड,
तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकुडे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, जेष्ठ साहित्यिक प्रा नामदेव वाबळे, ज्येष्ठ साहित्यिक कलानंद जाधव, जेष्ठ कवी प्रा विलास वैद्य, कवी गणेश येवले, गोडाती काळे संचालक थवा प्रकाशन हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.जया करडेकर, प्रस्ताविक कवी रतन आडे हे करणार आहेत. मान्यवरांचा परिचय कवी राजकुमार मोरगे हे करणार आहेत.
तर कवी संमेलनात सहभागी म्हणून कवी राजकुमार नायक सवनेकर, वाकोडे मामा, राजाराम बनसकर, रतन आडे, दिलीप धामणे, राजकुमार मोरगे, बबन मोरे, डॉक्टर राधिका देशमुख, सुमन दुबे, शिवाजी कराळे, प्रा. श्रीराम कराळे मदन अंभोरे लक्ष्मण सूत प्राध्यापिका संध्या रंगारी डॉक्टर निखिल नायक , महारुद्र घेणेकर, विजय गुंडेकर, श्रीरंग थोरात, व्हीसी पाईकराव, समाधान लोणकर प्रा. मुरलीधर पंढरपूर, शिवचरण रटकलकर, शफी बोल्डेकर, प्रद्युमन गिरीकर, डॉ.अभय भरतीया, डॉ.वंदना काबरा, डॉ. संजय नाकाडे, गणेश आघाव, रघुनाथ घुगे सविता देशमुख, पारिजात देशमुख लीना जाधव, आबा पांचाळ, बालिका बरगळ, गंगाधर धामणे, विजय ठाकरे, गणेश मागणे, गायत्री दर्गा संदीप पाटील, कैलास कावरखे, गौरी गुंडेवार ज्ञानदा चौधरी शिवदास पोटे ,अशोक गुट्टे नम्रता खिल्लारेरघुनाथ पतंगे, विलास भालेराव, मायादेवी सरवदे, बालाजी शेळके, ज्योती पतिंगराव, या.शी.काटकर, चां.रा.आघाडे,प्रकाश भालेराव, संगीता देशमुख, कुसुम होडबे, दिंगाबर जाधव, संगिता चौधरी, प्रदिप भालेराव, आरती पावडे, महासेन प्रधान, गजानन कष्टे, अक्षय बरडे, अहमद पठाण, साबेर बासमती, जमीर नजर, संगमेश्वर स्वामी, विजयकुमार ऐंगडे, बालाजी मोरे, प्रिया संगीत,रूपाली मोरे, दुर्गा पवार, कोंडीबा गायकवाड, अक्षय देशमुख, अमोल थिटे नामदेव ठोके,बंडू पुरी, दत्ता पुरी यांचा समावेश राहणार आहे.
या कविसंमेलनांचे संयोजक म्हणून कवि विजय गुंडेकर, अध्यक्ष साहित्य सृष्टी फाउंडेशन हिंगोली. हे आहेत. कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त साहित्यिक, रसिक , नागरिकांनी कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकुडे यांनी केले आहे.

Check Also

गंगाखेडमध्ये रविवारी ‘कोजागिरी संध्या,गुंजन पाटील यांची राहणार उपस्थिती

गंगाखेड, प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा नगरसेवक तथा गटनेते क्षितीज चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, …