24/10/26
Breaking News

ऑडिओ क्लीपवर खासदार श्रीकांत शिंदे यांची महत्वाची प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु असताना भाजपने दिलेले 500 कोटी रुपये  श्रीकांत शिंदे  यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवले, असा दावा करणारी ऑडिओ क्लीप  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मनोज जरांगे  यांनी ही ऑडिओ क्लीप समोर आणत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. अखेर श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केले.

श्रीकांत शिंदे यांनी ऑडिओ क्लीपचा उल्लेख करत म्हटले की, ते 500 कोटी रुपये माझ्यापर्यंतही पोहोचलेले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांना जो प्रश्न पडला तोच मलाही पडला आहे. 500 कोटी रुपये कुठे गेले? तेच पैसे मी आता शोधायला चाललो आहे. आमची आता तीच चर्चा सुरु होती की, 500 कोटी रुपये एकत्र कसे दिसतील? किती गाड्या लागतील, हा विचार आम्ही करत होतो. कोण काय बोलतंय यावर प्रश्न विचारले जात आहेत. या सगळ्या प्रकाराची चौकशी आणि शहानिशा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मीदेखील दोन दिवस रिसर्च करत होतो, 500 कोटी रुपये कुठे गेले? मला कळालं तर मीदेखील तुम्हाला सांगतो, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

 नेमकं काय आहे प्रकरण?

मनोज जरांगे पाटील यांनी जी व्हायरल ऑडिओ क्लीप समोर आणली होती, त्यामध्ये  या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये मिळाल्याचा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा असल्याचा दावा  करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपच्या आधारे मनोज जरांगे पाटील यांनी

Check Also

गंगाखेडमध्ये रविवारी ‘कोजागिरी संध्या,गुंजन पाटील यांची राहणार उपस्थिती

गंगाखेड, प्रतिनिधी : रामप्रसाद ओझा नगरसेवक तथा गटनेते क्षितीज चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, …