हिंगोली,दि 31
हिंगोली येथे झालेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेली पाच लाख रुपयांची आर्थिक मदत आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषदादा बांगर यांच्या वतीने कुटुंबीयांना प्रदान करण्यात आली.
या दुर्दैवी दुर्घटनेनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार आज आमदार संतोषदादा बांगर यांच्या वतीने ही मदत संबंधित कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक सुभाष बांगर, नगरसेवक गणेश बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, नगरसेवक रत्नाकर बांगर, नगरसेवक सुमित कांबळे, नगरसेवक विशाल गोटरे, रामकिशन बांगर, कॉन्ट्रॅक्टर संतोष बांगर तसेच कॉन्ट्रॅक्टर संदीप बांगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com