01/11/26
Breaking News

गोंधनखेडा येथील पाणी प्रश्न पेटला महिलांचे चक्क टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

मोहन कांबळे
सेनगाव,दि 31
केंद्र बुद्रुक सेनगाव तालुक्यातील जामठी गोंधनखेडा गट ग्रामपंचायत असून गोंधनखेडा येथे तीव्र आणि टंचाई भासत असून महिलांनी पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले गोंदणखेडा येथील ग्रामस्थांना यापूर्वी खाजगी नळाचे तीनशे रुपये महिना पाणी सुरू होते मात्र सध्या पाणी पातळी खालावल्याने व शेतीला पाणी पुरत नसल्याने संबंधित शेतकऱ्याने गावात येणारे पाणी बंद केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गोंधनखेडा येथे पाण्याची टाकी व खाजगी शेतामध्ये विहीर खोदून केवळ दोन वर्षांपूर्वी टेस्टिंग केली मात्र तेव्हापासून या पानाच्या टाकीमध्ये पाण्याचा एक थेंबही आला नसल्याने व संबंधित शेतकऱ्याने शेतातील पाणी गावामध्ये सोडण्याचे बंद केल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे यासाठी गोंधणखेडा येथील महिलांनी रीतसर पंचायत समिती विभागाला निवेदन देऊन पाणी टंचाई दूर करण्याची विनंती केली मात्र दोन-तीन दिवसापासून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने महिलांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल ने आंदोलन केले या आंदोलनाची जवळपास सात तास आंदोलनाच्या नंतर पाणीपुरवठा विभाग घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेऊन तात्पुरती पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन देण्यात आले या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच पाणीपुरवठा सेवक कोणीच फिरकले नव्हते एकंदर आंदोलन करणाऱ्या महिला यांनी जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा घेतला गोंधनखेडा येथील महिलांनी शोले स्टाईल आंदोलन करून टाकीवर चढत पाण्यासाठी आंदोलन केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे

Check Also

विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ग्लोबलच्या अक्षरा महाजनला रौप्यपदक

हिंगोली,दि 31  शिव शाहू प्रतिष्ठाण, पिंपळखुटा द्वारा संचलित व मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पुरस्कारप्राप्त …