07/11/26
Breaking News

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर खोटं का बोललात? रोहित पवारांचा पटेल,तटकरेांना सवाल

: ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, ते आज असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित दिसल्या असत्या असं सुनील तटकरे म्हणाले. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा गेल्यानंतर  तटकरेंनी याच्या उलट का सांगितलं? आता कदाचित त्यांच्या पक्षात तटकरे अडचणीत आल्यामुळे राजकीय भूमिका बदलली असावी, असंही रोहित पवार म्हणाले.

अजितदादा पवार जिवंत असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात होती. दादा आज आपल्यात असते तर 12 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसल्या असत्या, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. तटकरेंच्या या दाव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक होत पलटवार केला आहे.

विलीनीकरणावर खोटं का बोललात?”

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले, “अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते, हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. परंतु, दादांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी माध्यमांसमोर ‘विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती आणि दादांच्या मनात तसे काही नव्हते’ असे सांगत स्पष्ट नकार दिला होता.”

मग आता अचानक असे काय घडले की, ते पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याचे मान्य करत आहेत? दादांच्या निधनानंतर त्यांनी ही वस्तुस्थिती का लपवून ठेवली आणि खोटे का बोलल?” असा थेट सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

“तटकरे आणि प्रफुल पटेल स्वपक्षातच अडचणीत”

रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात सध्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल प्रचंड अडचणीत आले असावेत अशी शक्यता आहे. पक्षामध्ये त्यांचं सध्या कितपत चालतं, याबद्दल शंका आहे. स्वपक्षात अडचणीत आल्यामुळेच त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली असावी.”

Check Also

सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता धार्मिक सोहळ्याने सुरुवात झाली …