28/02/26
Breaking News

दहावी-बारावी परीक्षेआधी प्रशासन ॲक्शन मोडवर, ‘ती’ चूक महागात पडणार, थेट कारवाईचे आदेश

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च, तर दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहेत. परीक्षांदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात आणि त्यासभोवतालच्या 100 मीटर अंतरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रांच्या परिसरात तसेच त्या केंद्रांभोवती 100 मीटर अंतराच्या क्षेत्रात कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच परीक्षा केंद्राच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा देणारे विद्यार्थी, परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

परीक्षा काळात केंद्रांभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याचबरोबर, या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी-आयएसडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स सेंटर, ई-मेल, इंटरनेट सुविधा आणि त्याच प्रकारची इतर कोणतीही साधने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

Check Also

अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय,रोहित पवारांनी सगळ सांगीतलं

अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित …