23/06/26
Breaking News

अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय,रोहित पवारांनी सगळ सांगीतलं

अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.

विदर्भातील नेत्याच्या फाईलमुळे दादांना उशीर

रोहित पवार यांनी दावा केला की, “पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे.

५१,००० फुटांची झेप आणि इन्स्पेक्शनचा मुद्दा
तांत्रिक बाजू मांडताना रोहित पवार म्हणाले की, “लेअरजेट (बंबार्डिअर) हे ५१,००० फुटांपर्यंत उडू शकणारे अतिवेगवान विमान आहे. अशा विमानाचे उड्डाणापूर्वी रीतसर इन्स्पेक्शन (तपासणी) झाले होते का? जर झाले असेल, तर ते करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.” तसेच, अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान ‘मुंबई-सुरत-मुंबई’ असे फिरून आले होते, असेही त्यांनी सांगितले.

घड्याळाचे ‘९’ आणि जळलेला स्वेटर
रोहित पवार आजही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. “दादांचे घड्याळ नेहमी १५ मिनिटे पुढे असायचे. अपघात झाला तेव्हा ते ९ वाजता बंद पडले होते. घटनास्थळी सापडलेली बॉडी दादांची नसावी, ते परत येतील असे मला ६ दिवस वाटत होते. तिथे त्यांचा जळलेला स्वेटर आणि चप्पल सापडली आहे,” असे सांगताना रोहित पवार भावूक झाले होते.

विमान कंपनीचे ‘२७’ शेअर होल्डर्स
ज्या व्हीएसआर (VSR) कंपनीचे हे विमान होते, त्या कंपनीच्या मालकी हक्काबाबतही त्यांनी गौप्यस्फोट केला. कागदावर ३ शेअर होल्डर्स दिसत असले तरी प्रत्यक्षात २७ शेअर होल्डर्स आहेत आणि वेळ आल्यास ही नावे उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Check Also

महिला गर्भाशयाची गाठ काढायला गेली; पण भूल देऊन केलं भलतंच कांड

पुणे: डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो, कारण ते अनेकांना अगदी मृत्यूच्या दारातून परत आणतात. मात्र, पुण्यात …