04/02/26
Breaking News

Shabdraj

‘शब्दांचं धन’ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे – डॉ. अशोक खेत्री

सेलू ( प्रतिनिधी ) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे ‘ शब्दांचं धन ‘ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख पिंपळपानाच्या साथीने उमलतो. मारूती चितमपल्ली यांना उमेदीच्या काळात सावलीसारख्या अनेक थोर व्यक्ती भेटल्या. त्यांच्या सोबतच्या आठवणींना या पुस्तकातून मारूती चितमपल्ली यांनी उजाळा दिला आहे. असे प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक खेत्री ( वडवणी …

Read More »

नगर परिषदेच्या प्रवेशदारावर बेशरमाची झाडे लावून निषेध

सेलू ( प्रतिनिधी ) येथील उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली असुन सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे .येथे दररोज असंख्य पेशंट व सोबत त्यांचे नातेवाईक येतात. त्यांची या घाणेरड्या शौचालयामुळे गैरसोय मोठी गैरसोय होत आहे. व परिसरात दुर्गंधी देखील पसरत आहे . आपली तब्येत ठीक करण्यासाठी आलेल्या रुग्णांवर यामुळे आरोग्य खराब करण्याची वेळ आली आहे .तसेच त्यांना उघड्यावर …

Read More »

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार

पुणे – अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.   परिमंडळ अधिकारी ‘अ’ विभागांतर्गत डांगे चौक गणेशनगर काळाखडक, रहाटणी रामनगर, पिंपळे निलख गावठाण, मामुर्डी शितोळेनगर, परिमंडळ अधिकारी ‘ग’ विभागांतर्गत लोहियानगर, परिमंडळ …

Read More »

विद्यार्थ्यांनी चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे : डॉ. मलिकार्जुन करजगी

पाथरी / प्रतिनिधि –  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी जिमेदारीचे भान ठेउन समाजात वागले पाहिजे .आपण मोठे झाल्यानंतर ज्यांच्या सहकार्याने आपण ईथपर्यंत आलो त्यांना कधी विसरू नका तसेच विद्यार्थ्यानी चारीत्रसंपन्न बनले पाहिजे असे आवाहन पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयात दि. 30 जुन रोजी 27वा दिक्षांत समारंभात डाॅ .मल्लिकार्जुन करजगी बोलत होते . पाथरी येथील स्व. नितीन महाविद्यालयातील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राम फुन्ने …

Read More »

गंगाखेडमध्ये डेंग्यूचा वाढता प्रकोप – आरोग्य विभाग व पालिकेची निष्क्रियता

गंगाखेड – शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, अनेक भागांत नागरिक डेंग्यूने बाधित होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे वाढली असताना देखील, गंगाखेड नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरातील विविध वसाहतींमध्ये आणि मुख्य भागात अजूनही फवारणी झालेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व पालिकेच्या निष्क्रियतेमुळे संसर्ग …

Read More »

शक्तीपिठ महामार्गाच्या विरोधात पिंगळी,पोखर्णी येथे रास्ता रोको आंदोलन

परभणी,दि 01 ः राजु शेट्टी  यांनी शक्तीपिठ महामार्गाच्या विरोधात १२ जिल्ह्यात पुकारलेल्या चक्का ज्याम आंदोलनात आज परभणी जिल्ह्यातील शक्ती पिठ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहे. पिंगळी या गावातील परभणी ते नांदेड जाणारा राज्य मार्ग शेतकऱ्यांनी उडवून धरला ज्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होते तिथूनच शक्ती पिठ महामार्ग जाणार आहे. तिथेच आंदोलनास सुरुवात झाली …

Read More »

वसंतराव नाईकानी देशाला दिशा देण्याचे काम केले : प्राचार्य डॉ. बबन पवार

परभणी : येथील शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक, कृषी तज्ञ वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख …

Read More »

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांना वनामकृवित अभिवादन

परभणी,दि 01 ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठातील स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या हस्ते पुष्पपूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षण संचालक …

Read More »

गंगाखेड रोडवरील अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा,तातडीची बैठक व पाहणी

परभणी,दि 01 ः शहरातील जीवघेणा ठरत चाललेल्या गंगाखेड रोडवर झालेल्या दुर्दैवी बस अपघातात शेख समीर शेख मिया भाई व शेख मुशरान शेख मुस्तफा या दोन तरुणांनी आपला प्राण गमावला. २२ जून रोजी घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला, आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत, २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत तात्काळ …

Read More »

भाजपा मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष..एकच आला अर्ज

भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज केंद्रीय निरीक्षक किरेन रिजुजी यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. 1 जुलै रोजी संध्याकाळी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा …

Read More »