सेलू दि १७(प्रतिनिधी) विद्यार्थी अवस्था ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय अनमोल क्षण असतात.विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवताना शाळेने केलेले संस्कार आयुष्यभर शिदोरी म्हणून सोबत ठेवावे आणि आपल्या जीवनात कितीही मोठे झालात तरी शाळेला विसरू नका असा मोलाचा सल्ला नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे यांनी केले. येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख …
Read More »Shabdraj
सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांची माहीती मागवली…लवकरच…
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही सकारात्मक घोषणा होऊ शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हालचालींमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून 2025 पर्यंत …
Read More »विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता
पुणे,दि 16 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर उतरताना विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान जमिनीवर जोरात आदळले. त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला. मात्र तो जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर …
Read More »नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!’विज्ञानवारी’ लेव्हल–III साठी जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड
सेलू (प्रतिनिधी): परभणी येथील परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परीक्षेत नूतन विद्यालय, सेलू येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची तृतीय फेरी (लेव्हल–III) जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. विज्ञानवारी सेलू तालुकास्तरीय परीक्षेत सान्वी गजानन शितळे हिने प्रथम क्रमांक,तन्मय …
Read More »कायदे विषयक महा शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०० स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग
गंगाखेड,दि 16 ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी तथा तालुका विधी सेवा समिती गंगाखेड व जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.१४ फेब्रुवारी शनिवार) रोजी कापसे गार्डन,गंगाखेड येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा तसेच कायदे विषयक महा शिबिर उत्साहात संपन्न झाले. …
Read More »सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,सेलूतील शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा उपक्रम
सेलू ( प्रतिनिधी ) येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त नूतन विद्यालय व नूतन प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा ( वर्षे दुसरे )इयत्ता चौथी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवार ( दि. १५ ) रोजी संपन्न झाली. तीन गटात संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी …
Read More »अजित पवारांच्या मृत्यूच्या चार दिवसांत 75 संस्थांना अल्पसंख्यांक मान्यता
राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. तरीही ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे मान्यता देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुखवट्याच्या …
Read More »…तर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा
: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जमा होण्याची तारीख देखील समोर आली आहे. महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा मासिक लाभ (₹१,५००) मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आता पूर्णपणे अनिवार्य झाले आहे. …
Read More »बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समितीची स्थापना; अध्यक्षपदी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, सदस्यपदी प्रविण काबरा
गंगाखेड / प्रतिनिधी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या आदेशानुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी ‘बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती’ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. रत्नाकर गुट्टे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्यपदी प्रविण शांतिलाल काबरा यांची निवड करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच दि. १० फेब्रुवारी …
Read More »उज्जेनला निघालेल्या गंगाखडेच्या चार तरुणांचा अपघातात जागीच मृत्यु
जिंतूर (परभणी):देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला जिंतूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अकोली पुलावर भीषण अपघात झाला. बुधवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुलावर आदळली सुसाट कार मिळालेली माहिती अशी की, गंगाखेड येथील पाच मित्र एर्टिगा कारने (क्रमांक MH 14 KF 2790) उज्जैनला देवदर्शनासाठी जात होते. जिंतूर …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com