मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव मुंबई येथील आझाद मैदानावर पोहोचले आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मात्र, तिथे गेलेल्या बांधवांची खाण्या पिण्याची गैरसोय होत आहे. हे पाहून बीड जिल्ह्याच्या साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजाराहून अधिक भाकरी ठेचा चटणी लोणचं मुंबईच्या दिशेने पाठवले जात आहे.आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 50 हजार भाकरी, चटणी, ठेचासह …
Read More »मराठवाडा
पूर्णेत नगरपालीकेने तयार केलेल्या खड्यात बुडून बालकाचा मृत्यु
सुशीलकुमार दळवी पुर्णा,दि 29 ः पुर्णा नगर परिषदेकडून शहराच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडुन विश्वदीप संदीप कांबळे या दहा वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पुर्णा शहरातील हरीनगर भागात घडली काल २८ ऑगस्ट रोजी विश्वदीप पावसात बाहेर गेला होता त्यावेळी रात्रीच्या या परिसरात खड्डा पाण्याने भरला असताना त्याचा लक्षात न आल्या मुळे …
Read More »पुन्हा पाऊस..अलर्ट रहा..किती पडेल हे सांगता येणार नाही
गणेशोत्सवादरम्यान काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे. तर बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास ४० ते ६० किमी …
Read More »इतिहासातील सर्वात मोठ भगवं वादळ….अनेक किलोमीटरपर्यंत रांगा
परभणी,दि 27 ः मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यासाठी आंतरवाली सराटीतून सकाळी १० वाजता निघाले आहेत. त्यांच्यामागे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांचा ताफा आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून चौका-चौकात त्यांच्यावर फुलांची वृष्टी होत आहे. मनोज जरांगे यांचा ताफा आता पैठणमधून बाहेर पडला आहे. मनोज जरांगे पाटील पुण्यात आल्यानंतर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहेत. पुणे येथील वाहतूक व्यवस्था या मोर्चाच्या दृष्टीने चोख ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन …
Read More »आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी,वाचा अटी
परभणी,दि 27 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी एका दिवसासाठी देण्यात …
Read More »युनियन बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
परभणी,दि 26 ः परभणी शहरातील युनियन बँक शाखेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवार (दि.26) आंदोलन केल्याने कर्जप्रकरणे मंजुर झाली आहेत. या बँकेला अनेक गाव दत्तक आहे. त्यातील वझुर ता.पूर्णा येथील गावातील शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावत नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत गेल्या जुन महिन्या पासुन शेतकरी संपुर्ण कागदपत्रे देऊन सुद्धा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायला तयार …
Read More »श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती
परभणी,दि 26 ः येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविल्या. मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीमध्ये झाडांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. जेणेकरून त्या बिया जमिनीत जाऊन झाड तयार होईल. सदरील उपक्रमात एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मुर्त्या बनवल्या. या उपक्रमात प्रथम,द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांस बक्षिसे …
Read More »सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचे विचार व कार्य मानवतावादी होते : प्राचार्य डॉ. बबन पवार
परभणी,दि 26ः येथील शारदा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बबन पवार म्हणाले की महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी चक्रधर यांनी जगा आणि जगू द्या असा अहिंसावादी विचार जगाला दिला. …
Read More »परभणीत वंदे भारत एक्सप्रेसचे भाजपा महानगर कडून जल्लोषात स्वागत
परभणी ,दि 26 दक्षिण मध्य रेल्वेचा ऐतिहासिक क्षण आज मराठवाड्याने अनुभवला. हुजूर साहेब नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते (ऑनलाईन) हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रसंगी परभणी स्थानकावर गाडीचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. स्थानक परिसरात ढोल-ताशांचा …
Read More »मोरेगावात वानरांचा उच्छाद; ग्रामस्थ हैराण
सेलू,दि 25 ः सेलू तालुक्यातील मोरेगावात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांचा धुमाकूळ सुरू असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातील धान्याची नासधूस, गोरगरिबांच्या घरावरील पत्र्यांचे नुकसान, घराच्या छतावरील सौर प्लेट फोडणे, विजेच्या तारा तोडणे, लहान लेकराच्या हातातील वस्तू हिसकावणे, घरात उतरून भाकरी पळवणे, त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येतात अनेकांची पत्रे पाडली आहेत.त्यामुळे घराच्या बाहेर निघताना भिती …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com