09/11/26
Breaking News

 सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली

मुंबई,दि 22
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दर वाढले होते. त्यामुळे सोनं- चांदी विकत घेणं सध्या सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलं होतं. मात्र तो योग आता आला आहे. इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत असल्यामुळे सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जवळपास २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली आले आहे. सध्या सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार ६२९ रुपये तोळा इतका झाला आहे. तर चांदीचा दर २ लाख ३७ हजार ९३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. दरवाढीचे उच्चांक गाठल्यानंतर मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय पुढे ढकलला

  राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध …