24/03/26
Breaking News

मराठवाडा

आडगाव येथे जास्तीची जमिन दाखवुन शासनाची फसवणुक केल्याची तक्रार

वसमत,ता 22 ः वसमत तालुक्यातील आडगाव येथे एकाने नऊ एकर पाच गुंठे जमिनीची कागदोपत्री नोंद दाखवत पीक कर्जासह इतर शासकीय अनुदान उचलून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार एका शेतकऱ्याने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.दोन गटाची फोड करुन क्षेत्र कमी न केल्याचा लाभ उठवत हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.   आडगाव रंजे  येथील गट नंबर 587/01 आणि587/02न यामध्ये पांडुरंग मुंजाजी चव्हाण यांची  …

Read More »

जेष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी सभागृहात विधेयक मांडले आ.डॉ.राहुल पाटील

परभणी : ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण २४ तास उभे आहोत. ज्येष्ठ नागरीक मंचच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या समस्या तसेच दु:ख मी बघत आहे. शासकीय धोरणात ज्येष्ठांचे स्थान कुठे आहे याचे भान सरकारला आणून देण्यासाठीच आपण विधेयक मांडले असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले.   ज्येष्ठांच्या अनेक अडचणींना वाचा फोडण्यासाठी विधानसभेत ज्येष्ठांच्याबाबत विधेयक मांडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आ. डॉ. राहुल …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त गावांना आ.राजेश विटेकर यांच्या भेटी, पंचनाम्याबाबत दिल्या सूचना.

परभणी,दि 22  (प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक महसूल मंडळात 21 जुलै रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने काही ठिकाणी घरात पाणी शिरले तर अनेक शेतात पाणी साचले, काही ठिकाणी बांध फुटून शेती खरडून गेली आ राजेश विटेकर आज सकाळी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन अतिवृष्टी ग्रस्त शेतीची पाहणी केली.   सोनपेठ महसूल मंडळात 136 ,हदगाव 106., कासापुरी 215, …

Read More »

हदगाव बुद्रुकला अतिवृष्टीचा तडाखा,प्रशासनाचे तातडीचे मदतकार्य सुरू

  रमेश बिजुले पाथरी : पाथरी तालुक्यातील हदगाव बुद्रुक येथे मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ओसंडून वाहणाऱ्या लेंडी नदी व दोन्ही नाल्याच्या पाण्यामुळे इंदिरानगर भागातील सर्व घरे आणि जिल्हा परिषद शाळा तीन ते चार फूट पाण्यात गेली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीचे मदतकार्य सुरू केले आहे.   हादगांव बुद्रुक येथील पूरपरिस्थितीची माहिती …

Read More »

सेलू तालूक्यात दमदार पाऊस,नदीनाल्यांना पूर,सेलू पाथरी रस्ता बंद

परभणी,दि 22 ः मागील अनेक दिवसांच्या उघाडी नंतर १७ जूलै रोजी सेलू तालूक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाली होती.त्यानंतर २१ जूलै च्या मध्यरात्री संपूर्ण तालूक्यात सूरू झालेला दमदार पाऊस २२ जूलै मंगळवार सकाळी ९वाजेपर्यंत सूरूच होता त्यामूळे तालूक्यातील दूधना,कसूरा व करपरा नद्यांना पूर आल्यामूळे मंगळवारी दिवसभर तालूक्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती.   सोमवारी मध्यरात्री पासून मंगळवारी सकाळपर्यंत तालूक्यात सरासरी ५३.०६ …

Read More »

भाजपा परभणी महानगरच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : ४६५ रक्तदात्यांचा सहभाग

परभणी,दि 22 ः मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ४६५ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. परभणी महानगर अंतर्गत कौस्तुभ मंगल कार्यालय, परभणी (चिंतामणी मंदिर मंडळ), मारुती मंदिर, असोला (परभणी ग्रामीण मंडळ) देशपांडे हॉस्पिटल, क्रांती चौक, परभणी (खंडोबा मंदिर मंडळ) ज्ञानेश्वर माऊली …

Read More »

जिल्हा परिषदेत रंगला अधिकाऱ्यांचा निरोप व स्वागत सोहळा

परभणी – दिनांक 22 जुलै जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य श्वेता यादव यांची प्रशासकीय बदली जिल्हा परिषद कोल्हापूर येथे झाली. तसेच डॉ संदीप घोन्सीकर यांची परभणी येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, अंकुश चव्हाण यांची उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत तर डॉ संजय पांचाळ यांची जिल्हा आरोग्य अधिकारी …

Read More »

गौर येथील श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम

पूर्णा / प्रतिनिधी – एक पेड माँ के नाम या उपक्रमात सहभागी होऊन शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी रोपटे लागवड करून फोटो अपलोड करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक परभणी सविता बिरगे यांनी केले.   गौर येथील श्री सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा तपासणी भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी सविता बिरगे मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक अच्युत जोगदंड, …

Read More »

‘छावा’च्या पदाधिकार्‍यांवरील हल्ल्याचा परभणीत जोरदार निषेध

परभणी,दि.21(प्रतिनिधी) : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांच्यासह सहकार्‍यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी भर दिवसा वरिष्ठ नेतेमंडळींसमोर केलेल्या अमानुष मारहाणीचा येथील मराठा सेवा मंडळ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना यासह अन्य संघटनांनी सोमवारी (दि.21) संयुक्तपणे जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व सुरज चव्हाण यांच्या प्रतिमांना या संतप्त आंदोलनकर्त्यांनी जोडे मारले. …

Read More »

पेडगाव फाटा ते रेल्वे स्टेशन रस्ता उखडला,ग्रामपंचायतने केली रस्ता दुरुस्तीची सीईओंकडे मागणी

परभणी,दि.21(प्रतिनिधी) : परभणी ते मानवत या राष्ट्रीय महामार्गावरील पेडगांव फाटा ते पेडगांव रेल्वेस्थानकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अक्षरशः भयावह झाली असून जिल्हा परिषद प्रशासनाने या रस्त्याच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी पेडगांव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सोमवारी सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची ये-जा आहे. परंतु, रस्ता पूर्णतः उखडला आहे. आदळ आपट …

Read More »