30/06/25
Breaking News

विदयार्थी जर सुसंस्कारित असेल तर भविष्यात त्याला काहीच अडचण येणार नाही-सागर सुभेदार

सेलू ( नारायण पाटील )
येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दि २८/६/२५ रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी होते .तर प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ बडोदा शाखा विरार चे शाखाव्यवस्थापक तसेच याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर सुभेदार यांची उपस्थिती होती .
संस्थेचे सचिव प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारसुरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती .मान्यवरांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
या कार्यक्रमाचा उद्देश मुख्याध्यावक सिद्धार्थ एडके यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केला .यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की गुणवंत विद्यार्थ्यांची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी घ्यावी व शैक्षणिक प्रगती करावी .असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले .संस्थाचालकाचे योग्य मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य या बळावरच संस्थेची शैक्षणिक प्रगती होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
यावेळी बोलतांना सुभेदार पुढे म्हणाले की, विद्यार्थी जर लहानपणापासूनच सुसंस्कारित असेल तर भविष्यात त्याला कांहीच अडचण येणार नाही . शिक्षण घेताना कधीच नौकरी कडे न पाहता स्वतःचा उद्योगासाठी घ्यावे .कारण सध्याच्या धावत्या युगात आपण कसे टिकू हे महत्वाचे आहे . कारण आपली स्पर्धा निश्चितच मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांसोबत आहे .त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे .
महेश खारकर यांनी मनोगतात स्पष्ट केले की , या गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे .ज्यांना यावेळी सन्मान मिळाला नाही त्यांनी नाराज न होता जिद्दीने प्रयत्न करून अभ्यास करावा .हे व्यासपीठ आपला सन्मान करण्यासाठी देखील सज्ज आहे .विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी निश्चितच त्यांच्या प्रयत्नासोबतच संस्थेतील शिक्षकांचे योगदान देखील तेवढेच महत्वाचे आहे . या संस्थेत शिक्षणाचे बाजारीकरण होत नाही .असे विचार यावेळी अध्यक्षीय समारोपात ऍड अनिरुद्ध जोशी यांनी व्यक्त केले .

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या तसेच प्रत्येक विषयात प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .तसेच स्कॉलरशिप मध्ये तसेच भारतीय टलेंट सर्च तसेच जिंदाल परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला .उत्कृष्ट समनव्यक प्राप्त शिक्षक योगेश ढवारे यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मिळालेल्या पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले .तसेच यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व शिक्षकाचा व सेवक वर्गाचा देखील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सोनेकर यांनी केले तर गुणवंत विध्यार्थी यादी वाचन कीर्ती कुलकर्णी व योगेश ढवारे यांनी केले .नरेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Check Also

ध्येय निश्चित करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा-तहसीलदार डॉ. शिवाजी मगर

सेलू (नारायण पाटील ) जीवनात अशक्य असे काहीच नाही.समाजात जीवन जगत असतांना फक्त आपण स्वतः …