महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीकडून महिला आणि सवलतधारक प्रवासी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केलं आहे. एनसीएमसी कार्डच्या वापराची अंमलबजावणी 1 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या दरम्यान एसटी महामंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एनसीएमसी कार्डचा रिचार्ज 5 रुपयांच्या पटीत करता येणार आहे. ग्रामीण भागातील प्रवासी वारंवार प्रवास करत नाहीत, त्यामळं त्यांची रक्कम एनसीएमसी कार्डमध्ये अडकून पडत असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं एनसीएमसी कार्डचा रिचार्च 5 रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
50 रुपयांऐवजी आता 5 रुपयांच्या पटीत रिचार्ज!
आता NCMC कार्डमध्ये 50 रुपयांच्या पटीतच रिचार्ज करण्याची अट नाही. फक्त 5 रुपयांच्या पटीतही टॉप-अप करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज करणे होणार अधिक सोपं झालं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं एनसीएमसी कार्डच्या टॉप अपच्या नियमात बदल केला आहे. पूर्वी 50 रुपयांच्या पटीतच रिचार्ज करण्याची सुविधा होती. आता फक्त 5 रुपयांच्या पटीत टॉप अप करता येणार आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या गरजेनुसार 5,10, 15, 20, 25 रुपयांचा टॉप अप करता येईल.
Shabdraj www.shabdraj.com