सेलू / प्रतिनिधी – येथील नूतन विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक नारायण सोळंके आणि पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवागौरव समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सीताराम मंत्री, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे व शंकरराव बोधनापोड, जयदत्त बावणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात नारायण सोळंके व अन्नपूर्णा सोळंके, तसेच रोहिदास मोगल व सविता मोगल यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र सोनवणे व अमोल निकम यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सोळंके व मोगल यांनी संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. गुणवत्ता पारितोषिकासाठी प्रत्येकी २१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांच्या लेखाचे अनावरण झाले. प्रारंभी सरस्वती पूजन व सच्चिदानंद डाखोरे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमास यशवंतराव व केशरबाई सोळंके, विष्णू शेरे, शिवाजीराव मोगल, शोभा तौर आदींसह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन अदिती आंबेकर यांनी केले तर आभार विजेंद्र धापसे यांनी मानले.
Shabdraj www.shabdraj.com