रमेश बिजुले
पाथरी,दि 08
ग्रामीण रुग्णालय, पाथरी या ठिकाणी सोनोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झालेली सोनोग्राफी मशीन काही तांत्रिक अडचणी मुळे कार्यान्वित झाली नव्हती, ती नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्दन गोळेगावकर यांनी पाठपुरावा करून सुरू करून घेतली.आता ग्रामीण भागातील गरजू व गरीब रुग्णांना ह्याचा लाभ होणार आहे .
या मशीनचे उद्घाटन डॉ आर एस जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. ही मशीन चालविण्यासाठी पाथरी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ महालिंग महाजन हे उपलब्ध असणार आहेत.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्दन गोळेगावकर, वैद्यकीय अधिकारी; डॉ संदीप धबाले , डॉ श्वेता पामे तसेच डॉ महालिंग महाजन हे उपस्थित होते.
तसेच शीला पाटील, एस एम गुडमे, सीमा म्हस्के, प्रशांत दळवी, अरुण गव्हाणे , मयुरी खलापकर, संजय ढवळे हजर होते.
ह्या प्रसंगी डॉ जनार्दन गोळेगावकर यांनी प्रस्ताविक केले आणि डॉ महालिंग महाजन यांनी देत असलेल्या सेवेसाठी पुष्पगुच्छ देत कृतज्ञता व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ता संजय ढवळे यांनी सोनोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यासाठी मदत केली.
मशीन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दर बुधवारी गरोदर महिला साठी ही मोफत सेवा उपलब्ध असणार आहे, तरी पाथरी शहरातील गरजू व गरीब रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्दन गोळेगावकर यांनी केले आहे.
Shabdraj www.shabdraj.com