14/10/26
Breaking News

विवेकानंद विद्यालयात योगदिन साजरा

सेलू/प्रतिनिधी
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन (२१जून ) उत्साहात साजरा करण्यात आला.
शारीरिक व मानसिक आरोग्याच्या फायद्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या योगाचा जगभरात प्रसार होत आहे. योगसाधना मन व शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.शारीरिक व मानसिक सुदृढता राखण्यासाठी योग उपयुक्त आहेत.
वृषाली देशमुख व गजानन साळवे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायामाचे महत्व सांगितले व प्रात्यक्षिक करून घेतले.हरिभाऊ चौधरी ,उपेंद्र बेल्लूरकर ,करुणा कुलकर्णी ,शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले.

Check Also

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत गंगाखेडमध्ये विशेष शिबिर

गंगाखेड,दि 11 (प्रतिनिधी) : गंगाखेड येथील केशवनगरमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटप …