30/06/25
Breaking News

एच.ए.आर.सी संस्थेकडून गंगाखेडात 40 अनाथ,एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप

परभणी,दि 26 ः
गंगाखेड तालुक्यातील शिवाजी नगर तांडा, पिंपळदारी, मरडसगाव, कौडगाव, झोला, महातपुरी, सुनेगाव, सुप्पा, दत्तवाडी, दुसलगाव, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड, या जिल्हा परिषद शाळेतील अनाथ व एकल पाल्याची पालकत्व स्वीकारून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था परभणी तर्फे दि 26 जून रोजी 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले.
समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या एकल पालक व अनाथ मुलांची आबाळ होऊ नये त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी म्हणून दरवर्षी एच. ए.आर.सी संस्था या पाल्यांचे पालकत्व घेत असते.
असे आहे शैक्षणिक किट लोकसहभागातून तयार होणाऱ्या या शैक्षणिक कीट मध्ये उत्तम दर्जाची स्कूल बॅग, एक डझन वही,एक डझन रजिस्टर,कंपास बॉक्स इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उजळणीची पुस्तके, चित्रकला वही असा एकूण संच असतो या कीटला तयार करण्यासाठी अंदाजे बाराशे रुपयांचा खर्च येतो.
गंगाखेड तालुक्यातील वाचन प्रेमी निवडक जिल्हा परिषद शाळा जसे शिवाजी नगर तांडा, पिंपळदारी, मरडसगाव, कौडगाव, झोला, महातपुरी, सुनेगाव, सुप्पा, दत्तवाडी, दुसलगाव, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड ची यात निवड करण्यात आली. या शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक किट चे वाटप करण्यात आले.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेची मुख्याध्यापिका सौ अर्चना सोमवंशी, प्रमुख अतिथी म्हणून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ शैलेश कदम, राजेंद्र खापरे , नामदेव वैद्य, मनीषा जोशी इत्यादींची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कवियत्री इंदुमती कदम यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता डोकाडे मॅडम यांनी केले तर आभार शिवमाला लांडगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्थ राजुरे, सर्वेश माहुरकर सर्व शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे …