परभणी – परभणी जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएनच्या वतीने दि. 28 जून 2025 रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी जिल्हा टॅक्स प्रॅक्शिनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित चर्चासत्राचे उदघाटन पालकमंत्री ना.मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त धनजंय देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या दोन दिवसीय चर्चासत्राला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून शनिवार दिनांक २८ जून रोजी अॅड. राम हेडा (मुंबई), सीए आशिष बाहेती (पुणे) व सीए निलेश महाजन (पुणे) हे उपस्थित राहणार आहेत तर रविवार दिनांक २९ जून रोजी सीए अरविंद निर्मळ, सीए शाम धूत व सीए अनुप शुक्ल यांची उपस्थिती राहणार आहे.
हे चर्चासत्र शहरातील एमआयडीसी परिसरातील उत्सव लॉन्स येथे होणार असून या चर्चासत्राला राज्यभरातून टॅक्स प्रक्टिशनर्स उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त टॅक्स प्रॅक्टिशनर्सनी या चर्चासत्राला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष गोविंद भंडारी, टी पी ए चैप्टर चे अध्यक्ष सी ए रोहित मंत्री, सी ए कुशल गंगवाल, सचिव सचिन भोंबे, उपाध्यक्ष निलेश निलाद्रीराव, सहसचिव दशरथ भालके, कोषाध्यक्ष सतिश पितळे आदींनी केले आहे.