10/08/26
Breaking News

शंकर नगर येथे एनसीसीच्या वार्षिक शिबिरासाठी १० विद्यार्थिनी रवाना

हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली येथील सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या छात्र सेनेतील १० विद्यार्थिनी एनसीसीच्या वार्षिक शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे रवाना झाल्या आहेत. या विद्यार्थिनींना विद्यालय परिसरातून उत्साहात निरोप देण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे २५ मे ते ३ जून दरम्यान एनसीसीचे वार्षिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध उपक्रम, शिस्त प्रशिक्षण, शारीरिक क्षमता विकास तसेच नेतृत्वगुण वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी फर्स्ट ऑफिसर सोनल जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होत आहेत. यात सांची शीलसागर वाघमारे, माहेश्वरी कैलास जगताप, माहेश्वरी माधव वाघमारे, ज्ञानेश्वरी दत्तराव घुगे, पिहू गौतम खडसे, अपर्णा सुधीर गोगटे, प्रांजल अश्विन वाघमारे, शिल्पा राजू बोधनकर, प्रयुक्ता विजय घ्यार आणि पायल रमेश भवन यांचा समावेश आहे.
विद्यार्थिनींच्या या सहभागाबद्दल विद्यालय प्रशासन, शिक्षक व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

गंगाखेडात ‘सेफ फूड’ अभियान कागदावरच; अन्न प्रशासनाचा ‘कानाडोळा’?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे अन्न …