04/02/26
Breaking News

नगराध्यक्ष पदासाठी १५ तर नगरसेवक पदासाठी २१५ उमेदवारी अर्ज दाखल

सेलू / प्रतिनिधी – सेलू नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी एकूण २१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत

सेलू नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मागील आठ दिवसापासून सेलू तहसील कार्यालयात तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती आज सोमवार १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती . सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती साठी राखीव असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर २६ सदस्याच्या निवडणूक साठी एकूण २१५ उमेदवारी अर्ज दाखल झालेली आहेत या दाखल झाल्या सर्व उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी केली जाणार असून यानंतर २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर या निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

 

शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे अर्ज दाखल

संदीप हरिभाऊ काका लहाने, डॉ.अनिकेत अशोकराव जोगदंड ,भारत रंगनाथ कुकडे ,अनुसया प्रभाकर देवधर ,सपना हरिभाऊ काळे ,सय्यद हमीद दादामिया, श्रद्धा पवन घुमरे, शेख तसलीबी शेख कासिम , प्रियंका आकाश अंभोरे , शेख अमीनबी हुसेन, लक्ष्मी शांतिनंद साळवे, या अधिकृत उमेदवारी आज अर्ज दाखल केले
यावेळी मा. आ. हरिभाऊ काका लहाने, तालुकाप्रमुख संदीप भैया लहाने ,उपजिल्हाप्रमुख बाबा काटकर ,शहर प्रमुख पांडूरंग कावळे, हनुमान गात ,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख अब्दुल, शेअर संघटक गजानन शेलार, उपशहर प्रमुख रमेशआप्पा मुसुरे, उपशहर प्रमुख दीपक निवळकर, आदी मान्यवरांची उपस्थिती होती . सेलू शहराच्या विकासासाठी सुज्ञ व जागरूक मतदार आपल्याला विजयी करतील, असा ठाम विश्वास यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी यावेळी व्यक्त केला

तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा. कारण, विकास हाच आपला एकमेव अजेंडा आहे. त्यामुळे अहोरात्र परिश्रम घेऊन आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …