सेलू ( प्रतिनिधी )
शहरातील लक्कडकोट परिसरात एका १६ वर्षीत तरुणीवर वानराच्या टोळीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणीवर सेलू उपजिल्हा रुग्णालयातून परभणी व पुढे नांदेड येथे उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतांना ओढावलेल्या या संकटामुळे हे संपूर्ण कुटुंबीय अडचणीत सापडले आहे.
याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील लक्कडकोट परिसरात शुक्रवार २७ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वानराच्या टोळीने माधुरी राजेभाऊ पांचाळ वय १६ वर्षे या तरुणीस घरासमोर रस्त्यावर उभी असताना अचानक २५ ते ३० वानर आले व या टोळीने मुलीवर हल्ला केला.या हल्ल्यामध्ये माधुरी पांचाळ हिच्या डोक्यात जबर मार लागला आहे.तिला सेलू उपजिल्हा रुग्णालयातून परभणी व पुढे नांदेड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मुलीचे नातेवाईकाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली असून या तरुणीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे परिसरातील लोकांनी मदत करून रुग्णवाहिकेत बसून दिल्याचे सांगण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com