पाथरी (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल चा २५ वा स्थापनादिन पुणे येथे बुधवारी, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण द्वारे करण्यात आले.
पाथरी येथील अक्षय कॉम्प्युटर्स या ठिकाणी हा थेट प्रक्षेपण सोहळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वन अधिकारी पांडुरंग कोल्हे, मध्यवर्ती बँक ऑफिसर अतिष चव्हाण, पालक चव्हाण ताई तसेच अक्षय कॉम्प्युटर्सचे संचालक तुकाराम पौळ व सौ. शिवकण्या पौळ उपस्थित होते.
सकाळी १०:४५ ते दुपारी १:३० व दुपारी २:३० ते संध्याकाळी ४:१५ या दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात एमकेसीएलच्या स्थापनेपासून आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग याबाबत माहिती देत भावी योजनांवरही प्रकाश टाकण्यात आला.
या सोहळ्यास पाथरी परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्साह वाढवला. मान्यवरांनी एमकेसीएलने ग्रामीण व शहरी भागातील डिजिटल साक्षरतेस दिलेल्या चालनेबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
स्थापनादिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Shabdraj www.shabdraj.com