04/02/26
Breaking News

पूर्णा नगराध्यक्ष पदासाठी २८ तर नगरसेवक पदासाठी २१४ उमेदवारी अर्ज दाखल

पूर्णा प्रतिनिधी / सुशीलकुमार दळवी – पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी एकूण २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मागील आठ दिवसापासून पूर्णा तहसील कार्यालयात तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती.

 

आज सोमवार १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. पूर्णा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेच्यासाठी राखीव असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर २३ सदस्याच्या निवडणूक साठी एकूण २१४ उमेदवारी अर्ज दाखल झालेली आहेत. या दाखल झाल्या सर्व उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी केली जाणार असून यानंतर २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर या निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहेत

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …